Thursday, March 28, 2013

मला सतत असं वाटतं की
तुझ्या-माझ्या भेटीमधले चार शब्द सांडू नयेत.
दहा बोटांच्या मगरमिठीतले कोवळे श्वास उसवू नयेत.
एकांताच्या फुलोऱ्याला पानगळ कधी चिकटू नये.
कुतूहलाच्या अंकुराला लज्जेची दृष्ट लागू नये.
आपुलकीचं चक्र भाळीचं गर्वानेही भेदू नये.


मला सतत असं वाटतं की
या समोर फुललेल्या टपोऱ्या फुलाच्या दोन पाकळ्या हाती घ्याव्यात.
ती कुस्करली उष्णता ओजळीत घ्यावी भरून.
आणि तुझ्या रंध्रारंध्रातून स्रवणारा आनंद टाकावा पिऊन एका घोटात.
मग काय होईल..?? 
अशाने एकिकडे वैकुंठाची यात्रा भरेल.
आणि दुसरीकडे..? 
दुसरीकडे नवजन्माची जत्रा.
...................................................... पुस्तकातून.

2 comments:

  1. भारीच सुचाय लागलाय राव आपल्याला
    पावसाळ्या आगुदार मातीला वास लागाय लागलाय …
    Romance at its peak..

    ReplyDelete
  2. कशाला चेष्‍टा करता राव.

    ReplyDelete