Monday, February 4, 2013


छान पालक..
छान जन्म..
छान बालपण..
छान शिक्षण..
छान नोकरी..
छान लग्न..
छान मुलं..
छान जगणं..
घालून दिलेल्या वाटेवर फक्त चालत रहायचं.
गवसल्या गोष्टींचा आनंद नाही.
गमावल्या गोष्टींची खंत नाही.
वाट सोडून काही मिळवण्याचा अट्टहास नाही..
की वाटेत आलेल्या अडचणीला लाथाडणं नाही.
मर्यादेपलिकडे जाण्यासाठी झटणं नाही..
आणि नाविन्याची तहान नाही.
 फक्त चालत रहायचं.
वाटेत येईल ते घेत जायचं.
कागदावर मारलेली काही केल्या रेषा सोडायची नाही.
प्रत्येक पाऊल रेषेवर पडलं पाहिजे.
आपली स्पर्धा आपल्याशी?
नव्हे.. आपली स्पर्धा घालून दिलेल्या वाटेशी.
..
..
सरळ रेषेलाही ‘चौकट’ म्हणतात?
.......................................................... पुस्तकातून.


3 comments:

  1. अशाच काहीशा अनुभवातून काही वर्षांपूर्वी गेलो होतो...
    तुझ्या ओळींनी पुन्हा त्या दिवसात नेलं...
    जोखड झुगारून दिल्याच्या आधीचे काही सेकंद..
    फक्त शब्दांकित करता आले नाही...ती कमी तू पूर्ण केलीस...
    धन्यवाद मित्रा .....

    ReplyDelete
  2. मी जे लिहितो आहे.. त्याला तू आवर्जून प्रतिक्रिया देतोस. तीही उगाच नसते. मला याचं नेहमीच कौतुक वाटत आलंय.

    ReplyDelete
  3. गुड...हे जे सगळं तू ‘छान’ या विशेषणाच्या पंक्तीत लिहीलं आहेस ना, त्यामध्ये एक छान संधी असं मी अॅड करेन...एवढ्यासाठीच मित्रा, की ती छान संधी तुमच्या सरळ रेषेला वळणदार करेल...डोळ्याला लावलेली झापड आणि पावलांना आलेला ताठपणा जरा तुमच्या चौकटीतल्या आयुष्याला यशाची कमान देईल...अर्थात ही संधी पाहण्याची नजर स्वतकडे असलीच पाहिजे...ती मिळाली नाही, किंवा देणाऱ्याला समोरच्याची क्षमता ओळखताच आली नाही तर चालणाऱ्याचे आयुष्य चौकटीतच अडकून पडेल...पण तुझा ​​विचार अप्र​तिम...​विचार करायला लावणारा...

    ReplyDelete