Tuesday, January 1, 2013

काय मागू तुझ्याकडून..??
देशील?

माझ्या  कुवतीला नवं आव्हान मिळेल, असं काहीतरी दे.
माझ्या मेंदूमध्ये रुतून बसलेली..
ठसठसणारी नवनिर्मितीची भ्रांत गळून पडू दे.
माझ्या पंचेंद्रियांमधून वाहू देत की,
विचारांचे खळाळते प्रवाह.
प्राक्तनाच्या खुंटीवर कधीचा अडकवून ठेवलेला
काळाचा कल्लोळ काही वेळापुरता का असेना पण,  माझ्या हातात दे.
वेढून टाकणाऱ्या या नभांगणावर सहज टाकता येईल असं एक पाऊल मला दे.
सवंग, सहेतूक  उद्देशांना बगल देत पुढे जाण्याची किमया मला दे.
तुझ्या पोटात कधीचा गडप झालेला माझा एक मोती
तुझ्याच ओटीतून, मला परत मिळवून दे.
..
..
...
बघ यातलं तुला काय द्यायला जमंतं.

पण हे देणं देण्यासाठी
तुला चोरखिशात लपवलेली पुरचुंडी उघडावी लागेल.
.................................................................................... पुस्तकातून.

 



2 comments:

  1. तू कधी त्वेषाने पेटून उठून तलवार घेऊन निघालेला सैनिकच चित्र पहिलायस का रे ? स्वतःच्या मनगटी वर १०० टक्के विश्वास असलेला, चिलखत शिरस्राण घालून स्वारीला निघतो...त्याच्या तळपत्या तलवारीचा कवडसा आणि हवेत खूर उधळून दिलेला त्याचा अबलख घोडा ...त्याच्या डोळ्यांपासून ते त्याच्या उडणार्या केसांपर्यंत प्रत्येक बारकावा आपल्या लक्षात येऊ लागतो....कधी कधी तू सुद्धा एका हातात दौत आणि दुसर्या हातात पेन घेऊन असाच चित्रातल्या सैनिकासारखा स्वारीला निघालायस क्जी काय असा वाटत...समोर हजारो उडणारी पानं ...आणि त्यांवर आपला ठसा उमटवण्यासाठी आतुर एक मनस्वी लेखक..--

    ReplyDelete
  2. your comment is more beautiful than my thought. i am honored viju.

    ReplyDelete